मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी -सौ रश्मी दिदी बागल भाजप नेत्या सौ.रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली केम येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पवधीतच प्रगतीपथावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. राजकारणात देवा भाऊचा आदर्श ठेवून सर्वसामान्य जनतेची सेवा करत वाटचाल करावी असे मत भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ रश्मी दिदी बागल यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडल करमाळा तालुका यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस दिपक चव्हाण, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर केम शहराध्यक्ष विकास कळसाईत, जेष्ठ नेते रघुनाथ सावंत,जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय ताकमोगे, भाजप ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, किरण बोकन,मा. केम शहरअध्यक्ष गणेश तळेकर,मा जि युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर नागटिळक, बूथ अध्यक्ष शहराध्यक्ष, obc मोर्चा उपाध्यक्ष अमोल जरांडे, बूथ प्रमुख रवी मोरे, करमाळा विस्तारक रवी माळवे, युवा नेते महावीर आबा तळेकर, मकाई संचालक महेश तळेकर (सर), मा अच्युत (काका) पाटील, विजयसिंह ओहोळ,नवनाथ तळेकर, शिवाजी पवार, महेश ससाणे, मधुकर लोंढे, पांडुरंग कोळेकर,हभप ज्ञानदेव बोगाने, सौदागर दोंड,अक्षय कुलकर्णी,सौदागर गुटाळ, शिवाजी मोळीक, पांडुरंग तळेकर, प्रशांत तळेकर,अनिल वाघमोडे, हनुमंत खरवडे, शत्रुघ्न जाधव इ उपस्थित होते.उपस्थितीमध्ये केम येथील विठ्ठल मंदिरात 22 जुलै रोजी आठ ते पाच या वेळेमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवत विक्रमी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना रक्तदानाने शुभेच्छा दिल्या आहेत . यावेळी पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की नगरसेवक ते महापौर ते सहा वेळा आमदार दोन वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास परिवाराच्या संस्कारात वाढल्यामुळेच शांत संयमी आणि विकासाला चालना कोणी दिली असेल तर देवेंद्रजींनीच दिली.
लोककल्याणकारी योजना केंद्र व राज्य यांचा समन्वय घडवून शेतकऱ्यांना विविध योजना, उद्योग क्षेत्रात नवक्रांती प्रशासनामध्ये पारदर्शकता, सुसूत्रता, बेरोजगारासाठी नवनवीन नोकऱ्यांची संधी नवनवीन महामार्ग अशा विकासाच्या चालना देणाऱ्या कार्यामुळेच महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये अग्रेसर ठरत आहे आगामी काळामध्ये स्वयंपूर्ण खेडी तसेच महानगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही विरोधकाकडून कितीही टीका झाल्या तरी ही आपल्या प्रामाणिक कार्याचा ठसा त्यांनी सोडला नाही.
तसेच कार्यकर्त्याची जाण असणारा नेता म्हणजे देवेंद्रजी असं खंबीर नेतृत्व भाजपला मिळालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा वाढदिवस करमाळा भाजप ग्रामीण मंडळाच्यावतीने उत्स्फूर्तपणे रक्तदान करून साजरा करण्यात आला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आले. रक्तदान शिबिरात योगदान देणारे रक्तदाते व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी पदाधिकारी मित्र ज्ञात अज्ञात कार्यकर्ते सर्वांचे मनस्वी आभार करमाळा भाजप ग्रामीण मंडल तालुका अध्यक्ष सचिन ( बापू ) पिसाळ यांनी मानले.


