करमाळा

गणेशभाऊ चिवटेंचा संजयमामा शिंदे यांना पाठिंबा,भव्य पदयात्रा,सभा घेऊन केले जोरदार शक्तीप्रदर्शन*


करमाळा प्रतिनिधी :-विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बहुचर्चीत असलेले गणेशभाऊ चिवटे यांनी आज अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.येत्या दोन वर्षात तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे.विधानसभेच्या कार्यकाळात आपण सर्व प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावली असून येत्या दोन वर्षात तालुक्यातील राहिलेले सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे.गणेश भाऊ चिवटे यांना विकासाची दृष्टी असून आपणही विकासाच्या माध्यमातूम इथपर्यंत आलो आहोत त्यामुळे आता आमच्या या डबल इंजिन मुळे तालुक्यातील विकासकामे अधिक स्पीडने होणार आहेत.

*तालुक्यातील सर्व घटक स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने संजयमामा शिंदे यांना पाठिंबा:गणेशभाऊ चिवटे*
गत १५-२०वर्षात आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली.करमाळा शहर व तालुक्यातील विकासाची चक्र पाहिजेत तेवढ्या प्रमाणात फिरत नव्हती.तालुका शिक्षण,आरोग्य,रस्ते,वीज,रोजगार, उद्योग व्यावसाय या बाबतीत शेजारच्या मोठ्या शहरावर अवलंबून आहे.येत्या काळात जाणीवपूर्वक तालुक्यातील सर्व घटक स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
यावेळी करमाळा शहरात काढलेल्या पदयात्रेची सुरवात गणेशभाऊ चिवटे संपर्क कार्यालय गायकवाड चौक पासून झाली.पदयात्रेच्या मार्गात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवजी महाराज आदी महापुरुषांना पुष्पहार अर्पण केले.सभेचे नियोजन विकी मंगल कार्यालय येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रथमत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी नितीन झिंजाडे,अजिनाथ सुरवसे, बंडू शिंदे, जगदीश अगरवाल,विलासराव पाटील,भगवान गीरी, लतीफ तांबोळी, चंद्रकांत सरडे,श्री. मासाळ आदींची भाषणे झाली.सर्व वक्त्यांनी २० तारखेला सफरचंद या चिन्हापुढील बटन दाबून संजयमामा शिंदे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन उमेश मगर यांनी केले.व्यासपीठावर उद्धव माळी,कन्हैयालाल देवी, अफसर जाधव,रामा ढाणे,मोहन शिंदे,तात्या मस्कर, विवेक येवले,गौरव झाझुर्णे, संजय घोलप,काकासाहेब सरडे,श्री.राजेंभोसले,किरण फुंदे,भोजराज सुरवसे,आशिष गायकवाड,डॉ अभिजित मुरूमकर, नितीन निकम,सोमनाथ घाडगे, किरण शिंदे,जयंत काळे पाटील,धनु किरवे,धर्मा नाळे,दादा देवकर,उदय ढेरे,लक्ष्मण शेंडगे,सतीश फ़ंड,अभिषेक आव्हाड, हनुमंत मांढरे,गणेश वाळुंजकर,संगीता नष्ते,राजश्री खाडे, चंपावती कांबळे यासह गणेशभाऊ चिवटे यांचे करमाळा शहर व ग्रामीण भागातील हजारो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!