करमाळा

करमाळा शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या संकल्पनेतून मोफत डायलिसिस सेंटर रुग्णांना आधार देणारा उपक्रम – उद्योग मंत्री उदय सामंत

करमाळा प्रतिनिधी
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मार्फत करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या मोफत डायलिसिस सेंटर मुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे
असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाशिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून दहा डायलिसिस मशीन बसवण्यात आले असून मोफत डायलेसिस करून दिले जात आहेकरमाळा तालुक्यात व परिसरात 940 रुग्णांना डायलिसिस ची गरज आहे.करमाळा व आजूबाजूला 50 60 किलोमीटर परिसरात रुग्णांना नगर पुणे सोलापूर उपचारासाठी जावे लागत होते.शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण 20% राजकारण ही भूमिका घेऊन जिल्हाप्रमुख महेश चिवटे व मुख्यमंत्र्यांची विश्वासू सहकारी मंगेश चिवटेयांचे करमाळ्यातील सामाजिक योगदान अभिमानास्पद आहे अभिमानास्पद आहे असे उदय सामंत यांनी व्यक्त केले.

लवकरच कॅशलेस हॉस्पिटल उभा करणार

मंगेश चिवटे करमाळा तालुका व परिसरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे सुरू केलेल्या मोफत दवाखाना या धर्तीवर करमाळ्यात कॅशलेस दवाखाना सुरू करणार आहे असे मंगेश चिवटे यांनी यावेळी आश्वासन दिले आहे.

.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group