36 गावातून आमदार संजयमामा शिंदे गटाला धक्का नाडी येथील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
करमाळा प्रतिनिधी 36 गावातून संजयमामा शिंदे गटाला धक्का नाडी येथील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना बागल गटात जाहीर प्रवेश करत माढा तालुक्यातील नाडी या गावातील कार्यकर्त्यांनी विद्यमान लोकप्रतीनिधीच्या कार्यशैलीवर नापसंती व्यक्त केली आहे. संजय मामा शिंदे गटाला या सर्वांनी रामराम ठोकला . नुकतेच नाडी गावातील मा.बापू तांबे, मा.सुनिल तांबे, मा.शशीकांत तांबे, मा.आप्पा तांबे, मा.अनिल कोळी या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह करमाळा येथे शिवसेना बागल गटात जाहीर प्रवेश केला.यावेळी प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्षा रश्मी दिदीसाहेब बागल, भाजपचे युवक मोर्चाचे मा. दिपक चव्हाण, मा. अशोक हनपुडे यांची उपस्थिती होती.महायुतीचे उमेदवार व धडाडीचे युवक नेतृत्व दिग्विजय बागल यांना विधानसभेच्या आगामी निवडणूकीमध्ये निर्णायक मतांची आघाडी घेऊन आम्ही शिवसेना धनुष्यबाणाला अधिकाधिक मते मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.36 गावे आपल्याच हक्काची समजणाऱ्या लोकप्रतिनीधीना ही चांगलीच चपराक बसल्याचे बोलले जात असून मतदार व पदाधिकारी निर्भयपणे पुढे येत आहेत. मतदारसंघातील सर्व तरूणाई बागल यांचे प्रचारासाठी एकटल्याचे चित्र दिसून येत आहे. मा.रश्मी दिदीसाहेब बागल यांनी धन्यवाद व्यक्त करून अभिनंदन केले.
