कुंभार समाजाचा महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना जाहिर पाठिंबा .
करमाळा प्रतिनिधी दिग्विजय बागल यांना निवडून आणण्यासाठी कुंभार समाजाने उत्स्फुर्त पाठिंबा दिला आहे करमाळ्यातील वंचित समाजाच्या व्यथा जाणणारा नेता म्हणजे मा.मंत्री स्व. डिगामामा बागल होते. स्व. मामांच्या रूपाने करमाळा तालुक्याला मंत्रीपद मिळाले होते त्याचा उपयोग स्व. मामांनी सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून विकासासाठी केला. त्यांची विकासाची दृष्टी त्यांचे सुपुत्र दिग्विजय भैय्यांकडे दिसून येते. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत . धनुष्यबाणाला मत देऊन दिग्विजय बागल यांना निवडून आणण्यासाठी कुंभार समाजाने उत्स्फुर्त पाठिंबा दिला असल्याचे कुंभार समाजाचे प्रतिनिधी ज्ञानदेव कुंभार यांनी सांगितले. यावेळी बागल संपर्क कार्यालय येथे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी साहेब बागल, मा.विलासराव घुमरे सर, श्री. तनपुरे, तसेच गोरोबा काका मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व संपत कुंभार, बाळनाथ कुंभार, धर्मराज कुंभार, छगन कुंभार, मगन कुंभार, अशोक कुंभार, धनंजय कुंभार, उत्तम कुंभार व अन्य समाज बांधव उपस्थित होते.
