करमाळा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राजेभोसले यांच्या व्यंकटेश्वरा दूध मिल्क सेंटरचा लाभ घ्यावा- विलासराव घुमरे सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणुन दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचवण्याचे काम राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी केले असून व्यंकटेश्वरा मिल्क दूध केंद्राचा लाभ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे मत विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांनी व्यक्त केले. अभयसिंह राजेभोसले यांनी श्री कमलादेवी औद्योगिक वसाहत येथे सुरू केलेल्या व्यंकटेश्वरा दूध मिल्क सेंटरच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की राजेंद्रसिंह राजेभोसले यांच्या कार्याचा वसा त्यांचे सुपुत्र अभयसिंह राजेभोसले यांनी जपला असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव व तत्पर सेवा द्यावी त्यांच्या वाटचालीसाठी आपले सदैव सहकार्य राहील असे ते म्हणाले या कार्यक्रमास राजेंद्रसिंह राजेभोसले, दिनेश भांडवलकर, विलास जाधव, महावीर साळुंखे, परमेश्वर भोगल, चंद्रकांत काळे, स्वप्नील पवार, काकासाहेब मोरे दीपक शेळके, चंद्रकांत काळे, स्वप्नील पवार, बिभिषण आवटे, देवानंद ढेरे, रघुनाथ जगताप तात्यासाहेब जाधव, दिगंबर गाडे,, रवींद्र गोडगे उदय ढेरे, रियाज मुलानी, प्राध्यापक मुन्नेश जाधव सर प्राध्यापक हनुमंत भोंग सर ,श्री राऊत गुरुजी, सतीश निंबाळकर ,रवींद्र परदेशी, रामदास गायकवाड, राजेंद्र भोंगसर, दिनेश नलवडे, बापू वाडेकर, मदन निंबाळकर, मनोज आवटे कांतीलाल ढेरे, ईश्वर चव्हाण दिलीप काळे,औंदुंबर शेळके,प्रकाश ढेरे,जितेश चांदणे,हनुमंत जाधव,विश्वनाथ ढेरे,श्रीकांत जाधव,विशाल गणगे,सचिन गणगे हबीब शेख करमाळा तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी दुध संस्थाचालक,कर्मचारी आदीजण मोठया संख्येने उपस्थित होते.सर्वाचे स्वागत प्रशांत राजेभोसले,परिक्षित राजेभोसले मनोज राजेभोसले यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाचे आभार अभयसिंह राजेभोसले यांनी मानले.
