परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश बागडे यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी
परंडा येथील सराफ व सुवर्णकार असोसिएशनची कार्यकारिणी शुक्रवार (दि.१०) जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी सुरेश बागडे तर उपाध्यक्षपदी सागर लंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील सराफ व सुवर्णकार असोसिएशनची बैठक मनोज चिंतामणी यांच्या मातोश्री निवासस्थानी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सदर बैठकीत असोसिएशनच्या अध्यक्ष पदी सुरेश बागडे, उपाध्यक्षपदी सागर लंगोटे, सचिव पदी शिवाजी जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मनोज चिंतामणी,
नितीन महामुनी, प्रमोद वेदपाठक, दशरथ शहाणे, मिलिंद चिंतामणी, दिपक दिक्षित, पिंटु दिक्षित, शिवम पेडगावकर, बालाजी विधाते, शिवप्रसाद बागडे, अरुण बुरांडे, मनोज शहाणे, गोकुळ पंडित, ज्ञानेश्वर वेदपाठक , सागर शहाणे, शिवाजी पंडित, शंकर उदावंत ,तानाजी पंडित, भगवान शहाणे, ओंकार शहाणे, बिटू मुळीक, गणेश कवटे, शिवाजी पंडीत, संतोष कदम, संतोष नष्टे, दशरथ गोरे, सुरज कदम, अमोल क्षिरसागर, दशरथ गोरे, विष्णु मुळीक, स्वप्निल पोतदार, प्रविण मुळीक, अरुप कुमार, संतोष कदम अदीसह सुवर्णकार बांधव उपस्थित होते.
