मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवलमध्ये जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालयाचा समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
करमाळा प्रतिनिधी श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयाचे समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवल करमाळा आयोजित समूह नृत्य स्पर्धा दिनांक 8.02. 2023 रोजी करमाळा येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. स्पर्धेत *श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ, करमाळा* या शाळेने सहभाग घेऊन *प्रथम क्रमांकाचे* पारितोषिक पटकावले. कला शिक्षक श्री ज्ञानदेव गुरमे यांचे मार्गदर्शन लाभले व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शाळेला मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. श्री. चित्रसेन पाथरूट सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. नागनाथ पाथरूट सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय काळे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कर्मचारी वर्गांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
