Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

पारेवाडी रेल्वे स्थानकावर पूर्वी प्लॅटफॉर्मवर येणारी रेल्वे गाडी आता मात्र मेन लाईनवर उभी राहत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात गाडया पुर्वीप्रमाणेच येण्याची प्रवाशांची मागणी

केत्तूर, ( अभय माने) पुणे सोलापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण व दुहेरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर व कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानतंर सोलापूर पुणे लोहमार्गावरून रेल्वे गाड्या सुरू झाल्या,परंतु करमाळा तालुक्यातील पारवडी रेल्वे स्थानकावर पूर्वी प्लॅटफॉर्मवर येणारी रेल्वे गाडी आता मात्र मेन लाईनवर उभी राहत असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून शॉर्टकटचा वापर लागत आहे.

पुण्याहून सोलापूरकडे जाणारी रेल्वेगाडी नवीन प्लॅटफॉर्मवर येत आहे परंतु, सोलापूरहून पुण्याकडे जाणारी गाडी मात्र जुन्या प्लॅटफॉर्मवर न येता ती मधेच मेन लाईनवर थांबत आहे त्यामुळे प्रवाशांची ससेहोलपट होत आहे.

रेल्वेचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी दादर बांधण्यात आले परंतु येथेही वृद्धांना व लहान बालकांना जाता येतात त्रास होत आहे दादरला जाण्यासाठी तसेच उतरण्यासाठी शेवटपर्यंत बॅरिकेट वापरलेले नाहीत ते बसवणे गरजेचे महत्त्वाचे आहे.

” सोलापूर ते पुणे पर्यंत विद्युतीकरण व दुहेरीकरण पूर्ण झाले आहे पारेवाडी रेल्वे स्थानक येथे मात्र पुण्याकडे जाणारी गाडी मेन लाईनवर थांबत आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गाडी पूर्वीप्रमाणेच जुन्या प्लॅटफॉर्मवर यावी तसेच शिर्डी पंढरपूर कोरोना महामारीमुळे बंद केलेली रेल्वेगाडी पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी.
– उदयसिंह मोरे पाटील,प्रवाशी संघटना अध्यक्ष, केतूर

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group