पोथरे सोसायटी नुतन पदाधिकाऱ्यांचा सावंतपरिवाराच्यावतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी पोथरे वि. का. सेवा सहकारी संस्था मर्या. पोथरे चे बिनविरोध निवडून आलेले नूतन संचालक यांचा सावंत परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. सावंत परिवाराच्या वतीने मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत व पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत यांच्या शुभहस्ते हा सत्कार संपन्न झाला. यावेळी ॲड राहुल सावंत यांनी सर्व पोथरे ग्रामस्थांचे व सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकारी मंडळींचे आभार व्यक्त केले. निवडणूक बिनविरोध पार पाडून संस्थेचा खर्च वाचवला याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. त्याच बरोबर संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी ज्ञात-अज्ञात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल सावंत परिवाराच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी नूतन संचालक दत्तात्रय आढाव, संतोष वाळुंजकर, लक्ष्मण शिंदे, छगन शिंदे, सुभाष शिंदे, नितीन साळुंखे, आबासाहेब शिंदे, पंडित भांड, मच्छिंद्र दळवी, देविदास जाधव, प्रतिनिधी ईश्वर झिंजाडे या नूतन संचालकांचा सत्कार विठ्ठल आप्पा सावंत व ॲड राहुल सावंत यांनी केला. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे धनंजय पाटील, अंगद शिंदे, विठ्ठल शिंदे , संजय शिंदे, भाऊसाहेब झिंजाडे, शामभाऊ झिंजाडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मा चेअरमन प्रभाकर शिंदे, जयद्रथ शिंदे, पाराजी शिंदे , दिनकर शिंदे, दादासाहेब शिंदे, नाना पठाडे, छगन लगस, बाळू जाधव, बबन जाधव, दादासाहेब झिंजाडे, बबन शिंदे, आजिनाथ शिंदे, रावसाहेब शिंदे, अशोक ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
