शहीद हजरत टिपू सुलतान यंग सर्कल ग्रुप करमाळा यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
करमाळा-प्रतिनिधी
करमाळा येथील खाटीक गल्ली येथे शहिद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद़्घाटन जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या उपक्रमासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे जगदाळे साहेब, पायघन साहेब, साळवे साहेब, जगताप साहेब व वैद्य साहेब यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. तर सदरील उपक्रमाचे आयोजन जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष युसुफ शेख यांनी केले होते. यावेळी कांबळे यांनी बोलताना सांगितले कि, समाजा-समाजामध्ये एकोपा आणि सलोखा राहण्यासाठी महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने असे सामाजिक वेगवेगळे उपक्रम सातत्याने घेणे गरजेचे आहे. व करमाळा तालुक्यामध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती येथील सर्वच समाजातील नागरिक तेवढ्याच सामाजिक भावनेने साजरी करतात. व आज शहिद हजरत टिपू सुलतान यांची जयंती सुध्दा सामाजिक सलोख्याच्या भावनेतुन साजरी केली जात आहे. अशा प्रकारचे प्रतिपादन कांबळे यांनी मांडले.
या रक्तदान शिबीराला युवक वर्गाने भरभरुन प्रतिसाद दिला. तर या शिबीराचे रक्तसंकलन श्री कमलाभवानी ब्लड बँक करमाळा यांनी केले. सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहिद हजरत टिपू सुलतान यंग सर्कल ग्रुप करमाळा या संघटनेचे तौफिक पठाण, अमीर मणेरी, सोहेल पठाण, शाहिद पठाण, आरशीयान पठाण, अबशर पठाण, वसीम पठाण, तौसिफ मणेरी, फिरोज शेख, बब्बू शेख, अरशान पठाण तसेच सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.
