आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री स्वर्गीय राजशेखर रेड्डी यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संप्पन
मोरवड प्रतिनिधी
29 ऑगस्ट 2022 रोजी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री स्वर्गीय राजशेखर रेड्डी यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महात्मा जोतीराव फुले विद्यालय मोरवड ता.करमाळा या विद्यालयात संपन्न झाला. दादाश्री फाउंडेशन वीट चे संस्थापक, सचिव माननीय श्री काकासाहेब काकडे आणि महात्मा जोतीराव फुले विद्यालय मोरवड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वृक्षारोपणासाठी मोरवड गावातील महात्मा जोतीराव फुले विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी पण जमीन सपाटीकरण, खड्डे खोदण्यासाठी व माती भरण्यासाठी विशेष सहकार्य केले. तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश भाऊ करे-पाटील यांच्या योगदानातून मार्च 2022 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे तीन हजार प्रमाणपत्र व गोल्ड मेडल ,दोन हजार प्रमाणपत्र व गोल्ड मेडल, व एक हजार प्रमाणपत्र व गोल्ड मेडल अशी बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश भाऊ-करे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्था जंक्शन चे अध्यक्ष माननीय वसंत मोहोळकर दादाश्री फाउंडेशन वीट चे संस्थापक सचिव माननीय काकासाहेब काकडे,श्री सुधाकर कणसे उपसरपंच आनंदनगर,श्री मोहन रामचंद्र कुंभार ग्रामपंचायत सदस्य आनंदनगर, श्री उद्धव ज्ञानदेव माने माजी सरपंच जंक्शन मा.श्री माधव जाधव अध्यक्ष दादाश्री फाउंडेशन वीट प्रा डॉ. तायाजी तुकाराम लोंढे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा, श्री राजेंद्र मोहोळकर उद्योजक जंक्शन, माजी विद्यार्थी श्री नवनाथ नाळे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापक श्री नवनाथ मोहोळकर सर यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गणेश गायकवाड सर यांनी केले आभार श्री बाळासाहेब बनगर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हिंगणे सर श्री नवनाथ गायकवाड सर श्री विक्रम आनारसे सर, श्री सचिन मोहोळकर सर, श्री अजिनाथ मोहोळकर सर, श्री हरिचंद्र जाधव श्री राजेंद्र नाळे श्री गजेंद्र नाळे, सौ गवारी मॅडम व सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
