हाजी उस्मानशेठ तांबोळी यांना कोरोनाकाळातील उत्तम कामगिरीमुळे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोवीडयोध्दा पुरस्कार देऊन केले सन्मानित
करमाळा प्रतिनिधी
शिवसेना वैदयकीय मदत कक्ष डाॅ.श्रीकांत शिंदे फौडेशन यांच्या वतीने ठाणे येथील डाॅ.काशीनाथ घाणेकर नाटयगृहात कोवीड काळात ज्यांनी काम केले आहे अशा कोवीड योध्दाचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला कोरोना काळामध्ये जो व्यक्ती स्वतःच्या नातेवाईकांची सुद्धा विचारपूस करण्यास किंवा त्याच्या जवळ जाण्यास धजावत नव्हता अशा वेळेस अनेक रुग्णांचा धीर व आधार म्हणून हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी दिलदार मनाने पुढाकार घेतला होता त्यांच्या याच कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे रविवारी भव्य असा समारंभ आयोजित करून उस्मानशेठ तांबोळी यांचा सन्मान करण्यात आला यावेळेस तांबोळी यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की हा पुरस्कार म्हणजे मला माझ्या पुढील कार्यात आणखी जनसेवा करण्यासाठी ऊर्जा देणारे एक संजीवनी आहे कारण कोरोना काळामध्ये आणि अशा वेळेस मी ही कोरोनानेग्रस्त झालो होतो परंतु पहिल्यापासून समाजाची सेवा घेत माझे बंधु नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी अमीरशेठ ताबोंळी व संपुर्ण तांबोळी परिवाराने कोणताही स्वार्थ पाहिलेला नाही त्यामुळे मला लोकांचा आशीर्वाद व घरातील सर्वांची साथ या वेळी मोलाची लाभली त्यामुळेच मी कोरोनासारख्या आजारातून परतलो व परत एकदा जनसेवे साठी सज्ज झालो हा उठाठेव मी कोणत्याही पुरस्कारासाठी केला नव्हता परंतु आज मला मिळालेला हा पुरस्कार मला माझ्या पुढील कार्यासाठी ऊर्जास्त्रोत ठरणार आहे अशा प्रकारचे अभिमानास्पद वाक्य तांबोळी यांनी काढले.
तांबोळी यांच्या कार्याचा आलेख पाहता कोवीड काळामध्ये करमाळा सारख्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरी भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी समाजसेवेचा वसा घेणे हे काही सोपे नाही व त्यामध्ये अडल्यानडल्या वर रंजल्या-गांजल्या जनसामान्यांचा आधारवड म्हणून जीवन जगणे तितकेच कठीण आहे परंतु कोरोनासारख्या कठीण काळामध्ये तांबोळी यांनी या सर्व वाक्यांना शुल्लक असे करून ठेवले आहे असेच कुठेतरी जाणवते करमाळा येथे कोरोना काळा मध्ये नगरसेवक अल्ताफशेठ ताबोंळी व अमीरशेठ ताबोंळी यांनी कार्य करत असताना मास्क सैनी टायझर अन्नधान्य त्याचप्रमाणे आर्थिक बाजूने कमजोर असलेल्या अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार व उपचारासाठी पुणे बार्शी करमाळा नगर अशा विविध ठिकाणी उपचारासाठी सहाय्य करणे.
त्याचप्रमाणे पुण्यामध्ये कोरोनाने मोठ्याप्रमाणात थैमान घातले होते. अशा वेळेस जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आमदार खासदार घराच्या बाहेर नव्हते त्यावेळेस सुद्धा मोठ्या दिलदार मनाने घराच्या बाहेर निघून तांबोळी यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्याकडे कोणताही राजकीय वारसा व मोठे पद नव्हते तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनसेवा केले त्याचेच फलित आज डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे या ठिकाणी पहायला मिळाले तांबोळी यांचे लहान बंधू व करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी व पुतण्या अमीरशेठ तांबोळी हे सर्वजण जनसेवेसाठी सदैव तत्पर असतात या सर्व बाबींचा जनसेवेचा परिपाक म्हणजेच तांबोळी परिवार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
हा नयन दिपक सोहळ्यातून हाजी उस्मानशेठ तांबोळी यांना पुढील कार्यासाठी ऊर्जा देण्यासाठी नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे साहेब राज्यमंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री बच्चू कडू आमदार निलेश लंके ठाणे महापौर इत्यादी प्रमुख मान्यवरांनी हाजी उस्मान शेठ तांबोळी यांना शुभेच्छा देत असताना व त्यांच्या कार्याचा उजाळा करत असताना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
