वनविभागाची नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची कामगिरी कौतुकास्पद शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे केले वनविभागाचे अभिनंदन
करमाळा प्रतिनिधी
नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दहशतीचे वातावरण होते गेल्या दहा बारा दिवसांपासून अथक प्रयत्न करून वनखात्याला बिबट्याला जेरबंद ठार करण्यास. यश आले नसल्या बिबट्याला ठार करण्यास सर्वसामान्य जनतेला परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी केली होती याची वनविभागाने तातडीने दखल घेऊन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील तिघां निष्पाप व्यक्तींचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने वनविभागाला यश आले आहे.याबद्दल वनविभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळेसाहेब यांनी जनतेला धीर देऊन योग्य पध्दतीने सुचना केल्यामुळे वनविभागाचे मनोबल वाढवल्यामुळे बिबट्याला ठार मारण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पडली आहे याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी अभिनंदन केले आहे. शनिवारी सायंकाळी या बिबट्याला वांगी नं.४ (ता.करमाळा) येथील रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दहा-बारा दिवसांपासून वनविभाग व करमाळा पोलीस यंत्रणेनेची शोध मोहिम सुरू होती. परंतु हा बिबट्या कोणाच्या हाती लागला नव्हता तसेच दोन दिवसांपासून गायब झालेला व कोणाच्याही दृष्टिक्षेपास न आलेला नरभक्षक बिबट्या आज अखेर वांगी ४ परिसरात दिसल्याने याभागातील नागरिकांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली होती. परंतु वनविभाग व पोलीस यंत्रणेने या बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालून ठार केले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला असून शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी वनविभागाचे आभार मानले आहेत