आदिनाथ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सुध्दा पश्चिम भाग आमच्या पॅनलला मतांची ताकद देईल-आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी पश्चिम भागाने मला आमदार म्हणुन काम करताना भक्कम साथ दिली, आदिनाथ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सुध्दा पश्चिम भाग आमच्या पॅनलला मतांची ताकद देईल असा विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवला.
केतूर येथील सभेत ते बोलत होते. श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ची प्रचार सभा केतूर येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती बापुसाहेब पाटील होते तर यावेळी व्यासपीठावर सभापती अतुलभाऊ पाटील, संपत खाटमोडे,हनुमंत नवले
सुभाष जरीडे, रामनाना कोकणे, नवनाथबापू झोळ, संतोष पाटील, किरण कवडे, महादेव पोरे,
कानतोडे सर, विलास कोकणे, बंडू पाटील, शहाजी पाटील, रामहरी धाडे, निवास उगले सुहास निसळ, दादासाहेब कोकरे, चंद्रकांत पाटील, सुभाष राऊतमहादेव नगरे, नानासाहेब पवार सर , भानुदास बाबर,आबा पाटील, राजेंद्र भोसले सरपंच राजूरी, बाळासाहेब जरांडे, देवा नवले, महेश महामुनी, चिंतामणी कानतोडे, काका कोकणे, भिमराव येडे, पवन झांजुर्णे, दादा कानतोडे, राजाभाऊ झोळ, गणपत पाटील, राजू ठोंबरे, राजेंद्र खटके, आप्पासाहेब कानतोडे, सुभाष खाटमोडे, रामभाऊ मिंड, सुजित पाटील,
दत्ता महानवर, विनोद बाबर, सर्वनाथ पांढरे,
पंडीत माने, आमदार नारायण आबा पाटील,
राहूल गोडगे, सोशल मीडिया तालूकाप्रमुख संजय फडतरे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य सुजीत पाटील यांनी केले. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की या भागातील शेतकऱ्यांना पुरक अशा वीज, पाणी वदळणवळण सुविधा मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन या समस्या सोडवल्या. यामुळे माझी काम करण्याची क्षमता व चिकाटी या भागातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे. आदिनाथ कारखाना ताब्यात दिल्यास हा कारखाना काही करुन मी सुस्थितीत आणेल, भले यासाठी मला कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल असे ठामपणे आमदार नारायण आबा पाटील यांनी शेवटी सांगितले. सुत्रसंचलन आबासाहेब येडे यांनी केले.
प्रास्ताविक आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार संतोष पाटील यांनी मानले.
