करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना ताकदीने लढवणार -भरतभाऊ आवताडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख
करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना पुर्ण ताकदीने लढवणार असे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी व्यक्त केले आहे.महाराष्ट्र राज्यात सध्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काॅंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असुन या सरकारने कोरोना महामारी काळात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली चांगले काम केले असून मोफत रेशन शिधा वाटप जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणयासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबवण्यास सुरुवात गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या ३८९४ सदनिकांची सोडत कोरोना काळात शिवभोजन थाळी अवघ्या ५ रुपयांत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कोविड काळात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने गुगलसोबत भागिदारी केली. शाळांसाठी गुगल क्लासरूम प्रकल्पाची सुरुवात केली. असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनी जाहीर केला.
