आदर्श शिक्षक पांडुरंग जोशी यांच्या स्मृतीला उजाळा देत सामाजिक उपक्रमाद्वारे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम संप्पन
करमाळा प्रतिनिधी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये .ज्ञानाचा दिवा लावून त्यांचे जीवन प्रकाशमय करणारे व्रतस्थ आदर्श शिक्षक आदर्श पिता आदर्श मार्गदर्शक,कुटुंब वत्सल संस्काराचे धनी कर्मयोगी स्वर्गीय पांडुरंग गोपाळ जोशी तथा नामदेव जोशी यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन विविध सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांचे वर्षश्राद्ध साजरा करण्यात आले. सकाळी दहा ते दोन धार्मिक विधी संपन्न करून त्यांच्या प्रतिमेस त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून फुले वाहण्यात आली. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सुभाष चौकातील श्रीराम प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ निराधार नागरिकांना अन्नदान कैलासवासी जोशी गुरुजी त्यांच्या स्मरणार्थ करण्यात आले. दुपारी एक वाजता मकाई चेअरमन दिग्विजय बागल यांनी त्यांना भेट देऊन जोशी गुरुजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केली सायंकाळी पाच वाजता पवनशेठ दोशी यांच्या जीवदया मंडळातील मुक्या जनावरांना हिरवा चारा वाटप करण्यात आला यानंतर सायंकाळी सहा वाजता श्री देवीचा माळ येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य तसेच मिष्ठान भोजनाची वाटप करण्यात आले. सायंकाळी सात वाजता श्री कमलादेवीचे दर्शन करून कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास पत्रकार अविनाश जोशी सो मंजिरीताई जोशी मॅडम श्री गिरीश पांडुरंग जोशी मोहिनी ताई गिरीश जोशी संजय जोशी प्रीती संजय जोशी पत्रकार संजय शिंदे नेते अर्बन बँकेचे संचालक गोरख जाधव संदेश कार्यालयाची कॉम्प्युटर ऑपरेटर हरिभाऊ पिंपळे भाजप नेते संजय घोरपडे पत्रकार डी.जी. पाखरे,दिनेश मडके, प्रतिष्ठित व्यापारी संतोष कुमार गुगळे श्री भरत शेठ गांधी मास्टर जाकिर भाई शेख निलेश जोशी प्रज्ञाताई जोशी, चैतन्य पाटील सौ प्रीती पाटील राजादेव जोशी, रेखाताई जोशी बागल गटाचे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर, राष्ट्रवादीचे नेते अभिषेक आव्हाड, अशोक आव्हाड सर अलकाताई आव्हाड मारुती सुकले बबन भुतकर अभिजीत दुखले पिंटू ननवरे दत्ताभाऊ गायकवाड आदी मान्यवरांनी उपस्थित राहून जोशी गुरुजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
