केम रेल्वे थांब्याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा आदेशाची अंमलबजावणी होऊन रेल्वे थांबा मिळणार खासदार रणजीतसिहं नाईक निंबाळकर यांचे आश्वासन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम हे महत्वाचे रेल्वे स्थानक असुन दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचेशी झालेल्या मीटिंग मध्ये केम व जेऊर रेल्वे थांब्याविषयी चर्चा झाली लवकरच आदेशाची अंमलबजावणी होऊन रेल्वे थांबा मिळेल असे आश्वासन त्यांनी माढा मतदार संघाचे खासदार रणजीतसिहं नाईक निंबाळकर यांना दिले आहे. केम महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून करमाळा तालुक्यातील हे पंचक्रोशी मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे येथे जगप्रसिद्ध कुंकवाचे सौभाग्याचे लेने आहे. या गावात तीस ते पस्तीस कुंकू कारखाने आहेत हे कुंकू भारतामध्ये रेल्वेने सर्वत्र पाठवले जाते.
केम गाव हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे ,यांच्या आजूबाजूला असणारी दहा ते पंधरा गावे ही या गावावर अवलंबून आहेत कोविडच्या महामारीमुळे सर्व कोरोना काळापूर्वी हैदराबाद मुंबई एक्सप्रेस मुंबई हैदराबाद एक्सप्रेस चेन्नई मुंबई एक्सप्रेस मुंबई चेन्नई एक्सप्रेस साईनगर शिर्डी या सर्व रेल्वे गाड्यांचा केम स्थानकावर थांबा होता. परंतु कोणतेही पूर्व सूचना न देता रेल्वे प्रशासनने थांबा बंद करण्यात आला. होता.या गावात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. वीट भट्टी कामगार,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यामुळे पुणे मुंबई सोलापूर शिर्डी व तिरुपती बालाजी या ठिकाणी प्रवास करणारे विद्यार्थी कामगार नोकरवर्ग शेतकरी वर्ग कुंकू कारखाना देवदर्शन ला जाणारे वारकरी व अनेक ज्येष्ठ मंडळी यांची रेल्वे थांबा नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याने या गावातील अनेक व्यवसाय धंदे बंद पडले होते ग्रामीण भागातील मुलं मुली येण्या जाण्याची सोय नसल्याने पुढील शिक्षणापासून वंचित राहत होते .आता केमवासियासाठी आनंदाचा क्षण असुन खासदार रणजित नाईकनिंबाळकर यांनी केमवासियांची मागणी गांभिर्याने घेऊन रेल्वेमंत्री यांच्याकडे केम रेल्वे स्थानकावर थांबा मिळुन देण्याची मागणी मान्य करुन घेतल्याने सर्वाची सोय होणार आहे.
