बसवराज सोमनाथ चिवटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेतील गोरगरीब वृध्दांना अन्नदान
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मोबाईल क्षेत्रातले नामांकित श्री बनशंकरी मोबाईल शाॅपी च्या वतीने शाॅपचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर बसवराज सोमनाथ चिवटे उर्फ बच्चूशेठ यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्री बनशंकरी मोबाईल शाॅपी स्टाफ च्या वतीने गोरगरीब वृद्धांना श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेंतर्गत अन्नदान करण्यात आले. यावेळेस बनशंकरी मोबाईल शाॅप चे मालक बसवराज चिवटे यांच्या हस्ते जेवन देण्यात आले.यावेळी माजी अर्बन बँक संचालक शिवराज चिवटे, पैलवान अफसर तात्या जाधव , अमित लुकंड ,महादेव गोसावी या कार्यक्रमाचे आयोजन बनशंकरी मोबाईल शाॅपचे युवराज जगताप, अभिजीत पिसे, सागर सांगळे,बळीराम आवटे यांनी केले.
