आदिनाथ कारखान्यासाठी डाॅ.वसंत पुंडे यांंच्याकडुन दोन लाख सुपृद आदिनाथचे सहयाचे अधिकार बागल,डोंगरे,जगदाळे यांना प्रदान
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी माजी संचालक डॉ वसंत पुंडे यांनी दहा लाख रुपये जाहीर केले होते. त्यानुसार आज दोन लाख रुपये मदत कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांच्याकडे दिले आहे.तर सहयाचे अधिकार रश्मी बागल,धनंजय डोंगरे,नितीन जगदाळे यांना देण्यात आले आहे.
यावेळी माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे मा आमदार नारायण पाटील गटाची नेते देवानंद बागल,पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, कारखान्याचे संचालक नितीन जगदाळे. आदीजण उपस्थित होते.तीन वर्षापासून कारखाना बंद होता.कारखान्याचे नियोजन करण्यासाठी बचाव समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच आजी माजी संचालक एकत्र येऊन कारखाना चालू करण्याचे नियोजन करत होते.त्या अनुषंगाने कारखान्याला आवश्यक तशी मदत करण्याचे सर्वानुमते ठरले होते. आज डॉक्टर पुंडे यांनी मदत केली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य दत्ता जाधव यांनी एक लाख रुपये दिले आहे. आदिनाथ
कारखान्याचा सह्यांचा अधिकार मिळावा म्हणून मंत्री तानाजीराव सावंत,माजी आमदार नारायण पाटील,बागल गटाच्या नेते रश्मी बागल यांची बैठक झाली आहे. त्या बैठकीत असे ठरले की, पाटील गटाला सहयाचे अधिकार एकजणास देण्याचे ठरले असुन पाटील गटाच्यावतीने नितीन जगदाळे तर बागल गटाचे अधिकार धनंजय डोंगरे व रश्मी बागल यांना देण्यात आले आहे.
