करमाळा उपजिल्हा रुग्णालयात औषधाचा तुटवडा सर्वसामान्य रुग्णांचे हाल योग्य तत्पर सेवा देण्याची नागरिकांची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात सर्वात मोठे उपजिल्हा कुटीर रुग्णालय असून गोरगरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी एक वैद्यकिय सेवा देण्याचे एक मोठे आधार केंद्र आहे. सरकारी आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी हे रुग्णालय आहे. पण सध्याच्या काळात येथे औषधाची मात्र वाणवा असल्याचे चित्र सध्या दिसून आहे.क सर्वसामान्य परिस्थितीतील पेशंटला सध्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला अंगदुखी ताप असे वायरल इन्फेक्शनचे त्रास सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये खोकल्याचे औषध गेले एका आठवड्यापासून उपलब्ध नाही. जुन्या स्टॉकही शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत असून एवढे मोठे असतील असताना सुद्धा सोयी सवलती सर्वसामान्य नागरिक वंचित राहावं लागतंलागत आहे त्यामुळे कुठे रुग्णालयाच्या या अवस्थेला नक्की कोण जबाबदार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केला जात आहे.सर्वसामान्य माणसांना खाजगी दवाखाना परवडत नाही सरकारी रुग्णालय असूनही तेथे सुविधा नाही अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकाच्या अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली असून याबाबत अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी ताबडतोब लक्ष देऊन कुटीर रुग्णालयाची अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे ताबडतोब औषधासह सेवा द्यावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.