जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन दत्त मंदिर करमाळा विकास नगर येथे सकाळी आठ ते सहा या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ०४ जानेवारी २०२५ ते दि. १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने 17 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये दत्त मंदिर विकास नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सिकलसेल ॲनेमिया, हिमोफिलीया, पॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्ताबाटल्या देण्याचे काम नरेंद्राचार्य संस्थान संप्रदायामार्फत निश्चित केले करून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त ५ मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत, तुमच्यासाठी ते आहे फक्त दान, मात्र गरजुंसाठी ते आहे जीवनदान स्वतः बरोबर आपल्या मित्र व नातेवाईकांस या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी आपला बहुमोल वेळ काढून खालील ठिकाणी रक्तदान करण्यास येवून या सामाजिक कार्यात सहभागी होवून आम्हास उपकृत करावे असे आवाहन जगद्गगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.