पवार जनरल हॉस्पिटल करमाळा विश्वराज हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च रोजी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील सुप्रसिद्ध पवार जनरल हॉस्पिटलचे
डॉक्टर रविकिरण ज्ञानदेव पवार डॉक्टर अजिंक्य रविकरण पवार व पुणे लोणी काळभोर येथील प्रसिद्ध विश्वराज हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे अशी माहिती पवार जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रविकिरण पवार यांनी दिली आहे.शुक्रवार दिनांक 1/3/2024 सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत .मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आले आहे.या शिबिरात मेंदूचे सर्व विकार मणक्याचे सर्व विकार पोटाचे सर्व विकार फुफ्फुस व श्वसनसंस्थेचे सर्व विकार जठर व आतड्यांचे सर्व विकार यावरील आजारांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे तरी जास्तीत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ रवीकिरण पवार यांनी केले आहे.
