Thursday, April 17, 2025
Latest:
Uncategorized

वंजारवाडी येथे भाजपाच्या सौ.प्रतीक्षा प्रवीण बिनवडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड

 

करमाळा – मौजे वंजारवाडी येथील ग्रामपंचायत ही भाजप, पाटील व बागल गटाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाली आहे, सरपंच पदी भारतीय जनता पार्टी प्रज्ञा सेलचे तालुका अध्यक्ष प्रवीण बिनवडे सर यांच्या पत्नी सौ. प्रतीक्षा प्रवीण बिनवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे ,
ग्रामपंचायत सदस्य पदी आशा राख, सुधामती केकान, विनोद केकान, आक्का वाघमोडे, रूपाली बिनवडे, अजय खाडे यांच्या निवडी झाल्या आहेत,
या सर्वांचे भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा संपर्क कार्यालय येथे हार, नारळ, फेटा बांधून सत्कार करून अभिनंदन केले,
यावेळी सरपंच प्रवीण बिनवडे यांनी गणेश भाऊ आपण गेल्यावर्षीमा  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वराज सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या देऊन सहकार्य केल्यामुळे व सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज मी सरपंच झालो आहे असे सांगितले,
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन , ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,अशोक ढेरे ,रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, मोहन शिंदे, अमोल पवार,दासाबापु बरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group