संत जगनाडे महाराज यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी-विठ्ठल क्षिरसागर
करमाळा प्रतिनिधी संत जगनाडे महाराज यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून. संत तुकाराम महाराज यांचे शिष्य म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराजाच्या गाथेमधुन समाज सुधारकाचे काम केले असून त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांनी व्यक्त केले. संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिम्मित जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की संतानी समाजातील कुठल्या एका वर्गासाठी केले नसुन सपुंर्ण समाज कल्याणाचे कार्य केले आहे .या संतांच्या जीवनाचा अभ्यास करून आपले जीवन समृद्ध करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .आजच्या धकाधकीच्या युगामध्ये माणूस माणुसकी विसरला असून संताचे जीवन हेच खरे आपल्या जीवनाचे सार असून त्यांच्या जीवनाचे आचरण हीच खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी करण्यासारखे आहे. या कार्यक्रमास पत्रकार दिनेश मडके, निलेश होनकळसे, गणेश क्षिरसागर, शंभू मेरूरकर बाबासाहेब माकुडे, प्रेम क्षिरसागर ,महावीर पोळ राजेश होनकळसे, गणेश कांबळे, राहुल कांबळे दिनेश माने, गणेश किरवे गोकुळ मडके, प्रसाद क्षिरसागर शुभम क्षिरसागर उपस्थित होते .
