करमाळा

करमाळा तालुक्यातील २२० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार -मनोज राऊत


करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २३० शाळांपैकी दहा शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. उर्वरित २२० शाळांमध्ये जिल्हा नियोजन समिती तसेच पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, ही प्रक्रिया तातडीने सुरू झाली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या २३० प्राथमिक शाळा असून, खासगी अनुदानित व विनाअनुदानित अशा ८८ शाळा आहेत. या खासगी शाळांपैकी ४३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ४५ शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत. त्यानुसार संबंधित शाळांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पोलिस दादा व पोलिस दीदी असे कार्यक्रम करमाळा पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत राबविले जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे. महिन्यातून एकदा पोलिस प्रत्येक शाळेत जाऊन मुलांशी चर्चा करून, त्यांच्या तक्रारी समजून घेणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी सखी सावित्री समिती, परिवहन समिती व बाल सुरक्षा समिती याची उभारणी प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असून, त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. तसेच पंचायत समितीमार्फत प्रत्येक शाळेत मुलींना बँड टच व गुड टच याचा प्रोग्राम घेतला जाणार आहे, असे गट विकास अधिकारी मनोज राऊत राऊत यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group