करमाळा

गणरायाला हार, फुले, मोदकासह वह्या, पेन ,पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करा -सौ लक्ष्मी सरवदे

करमाळा प्रतिनिधी 
समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून गणेश उत्सवात विद्येची देवता असलेल्या गणराया चरणी हार, फुले ,मोदकासह वह्या, पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य गणेशभक्तांनी अर्पण करावे असे आवाहन घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या तथा माजी सरपंच सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे‌. दिनांक ७ सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे दहा दिवस गणेश महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आकर्षक रोषणाई ,देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व पक्ष संघटना कडून स्तुत्य असे उपक्रम देखील राबविले जातात याचाच एक भाग म्हणून गणेश भक्तांनी दर्शनाला येताना हार, फुले, नारळ ,पूजेच्या व प्रसादाच्या वस्तू सह वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग,शैक्षणिक साहित्य गणराया चरणी अर्पण करावे सदर वस्तू गरजू विद्यार्थ्यांना देण्यास उपयोगी पडतील शहरातील तसेच ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून येणाऱ्या भक्तांना एक वही एक पेन उपक्रमा बाबत आवाहन करावे जमा झालेले शैक्षणिक साहित्य परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावे असे आवाहन घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या तथा माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!