करमाळासकारात्मकसामाजिक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले आहे. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती चौक येथे ध्वजारोहण करून दुपारी बारा वाजता दिव्यरत्न गोशाळा येथे चारा वाटप ,दिनांक 16 फेब्रुवारी रोजी कॅरम स्पर्धा या स्पर्धा केमिस्ट भवन येथे दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेचे उद्घघाटन त्यांचे महावितरणचे उपअभियंता सुमित जाधवसाहेब, पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन जगताप,पोलीस उपनिरीक्षक विनय माहुरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम छत्रपती चौक येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे. शिवश्री गंगाधर बनबरे यांचे लढायाच्या पलीकडले छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कुंडलिक उबाळेसाहेब ,कृषी अधिकारी संजय वाकडे करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे जिल्हा परिषद बांधकाम विभाग दिलीप गौंडरे साहेब,दुय्यम निबंधक अंरविद कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी हलगी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धाचे उद्घघाटन. गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक सकाळी आठ वाजता शिवभक्त सेवक वसंत जाधव, अमोल गाढवे, यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.सकाळी नऊ ते अकरा मर्दानी खेळ दांडपट्टा लेझीम मलखांब याबरोबरच सकाळी नऊ वाजता छत्रपती चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या विविध स्पर्धाच्या बक्षीस वितरणानंतर मुकबधीर शाळेस वाॅटर फिल्टर वितरण करण्यात येणार असून याचे उद्घघाटन तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, एसटी डेपो मॅनेजर अश्विनी किरगत वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल डुकरे हे उपस्थित राहणार आहे .दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून भव्य अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीमध्ये करमाळा शहरातील सर्व बँड उंट घोडे स्वराज डीजे एस एम लाइट्स पुणे हे प्रमुख आकर्षण असणार आहे .मिरवणुकीचे उद्घाटन उपविभागिय पोलीस अधिकारी विशाल हिरेसाहेब यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला सर्व शिवभक्तांनी बहुजन बांधवानी उपस्थित राहावे तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समिती करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!