Monday, April 21, 2025
Latest:
Uncategorized

ग्रामरोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन चालूच मागील पंधरा वर्षापासून ग्राम रोजगार सेवक अल्प मानधनावर काम

प्रतिनिधी ग्रामरोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन चालूच आहे.मागील पंधरा वर्षापासून ग्राम रोजगार सेवक अल्प मानधनावर काम करत आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुयेज्ञ 262 कामे करून हजारो मजुरांच्या हाताला काम देणारा आज मीतिला संसाराचा गाडा चालविण्यास असमर्थ आहे ,मनरेगा सारखी योजना ग्राम रोजगार सेवकांनी प्रभावी अंमलबजावणी करून प्रगतीपथावर आणली आणि कायद्याचे रूपांतर करण्यास भाग पाडले आजमीतिस पूर्ण भारतभर या कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी होत आहे मनरेगातून राज्याला प्रगतीपथावर आणणारा मनरेगाचा मुख्य कणा ग्राम रोजगार सेवक यांची सहनशीलता पूर्ण संपलेली आहे त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे त्यामुळे स्वतःचा संसार, मुलांचे शिक्षण, आरोग्य, सण, करण्यास ग्राम रोजगार सेवक मेटाकुटीला आलेला आहे त्यातच त्यांना मिळणारे अल्पसे मानधन ही वेळेवर मिळत नसून ते वेळेवर मिळावे म्हणून दिनांक 05/12/2022 पासून सर्व ग्राम रोजगार सेवक काम बंद आंदोलन करीत आहेत ग्रामरोजगारांच्या मागण्या ग्रामरोजगार सेवकाला दिनांक २/५/२०११ रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करून पूर्णवेळ करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकाचे आकृतीबंध समायोजन करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे, किमान वेतन कायद्याअंतर्गत ठराविक मासिक वेतन ग्राम रोजगार सेवकांच्या थेट खात्यावर देण्यात यावे, एन एम एम एस अंतर्गत ऑनलाइन हजेरी तात्काळ बंद करून ऑफलाइन हजेरीसाठी मान्यता देण्यात यावी, एन एम एम एस अंतर्गत ऑनलाइन हजेरी घेण्यास बंधनकारक असल्यास अँड्रॉइड मोबाईल इंटरनेट रिचार्ज सहित देण्यात यावा जेथे जेथे ऑनलाईन हजेरी घेण्यास शक्य नाही तेथे ऑफलाईन हजेरीची मान्यता देण्यात यावी,ग्राम रोजगार सेवकांना विमा संरक्षण प्रदान करण्यात यावे या मागण्यासाठी करमाळा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक हे ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना 5102 यांचे माध्यमातून काम बंद आंदोलन पुकारत आहे.
या मागण्याचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा म्हणून हे आंदोलन पूकारण्यात आले आहे असे मत करमाळा तालुकाध्यक्ष कृष्णा ढेरे यांनी व्यक्त केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group