Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाराजकीयसकारात्मक

श्रीदेवीचामाळ येथे ॲड राहुल सावंत यांच्या विकासनिधीतुन श्री कमलादेवी मंदीरात बसविलेल्या दोन लाख रुपये किंमतीच्या आर ओ प्लॅन्ट उदघाटन

 

करमाळा प्रतिनिधी
श्री देवीचा माळ येथील श्री कमलादेवी मंदीरात पंचायत समितीचे सदस्य ॲड. राहुल सावंत यांच्या विकास निधीतून श्री कमलादेवी मंदीरात आर ओ ( पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टर ) प्लॅन्ट बसविला असुन या प्लॅन्ट चे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा श्री मनोज राऊत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती चे सदस्य ॲड राहुल सावंत, श्री देवीचामाळ चे सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दिपक थोरबोले, सदस्य संतोष पवार , दादासाहेब पुजारी, महादेव भोसले, संचालक वालचंद रोडगे, माजी नगरसेवक फारूक जमादार, नारायण सोरटे, ह भ प हनुमंत काळे, हभप विलास जाधव, मारुती सुरवसे, अशोक गाठे, साहेबराव सोरटे, समाधान सोरटे , संतोष चोरमले, राजेंद्र पवार, सचिन चव्हाण, प्रमोद गायकवाड, ग्रामसेवक आबासाहेब शिंदे आदी जण उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. मनोज राऊत म्हणाले की, माजी पंचायत समितीचे सदस्य ॲड. राहुल सावंत यांच्या विकास निधीतून भक्त व ग्रामस्थ यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था पाहिजे म्हणून ॲड राहुल सावंत यांनी विशेष प्रयत्न करून आपल्या निधीमधून या ठिकाणी आर ओ ( पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टर ) प्लांट बसविला असून त्याचा फायदा येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना होणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरओ प्लांट चे नियोजन करण्यात आले. असेच लोकहिताचे व सामाजिक उपक्रम राबवण्याचे कार्य यापुढेही तुमच्या हातून सदैव घडणारच आहे अशा शुभेच्छा वाढदिवसानिमित्त दिल्या.
यावेळी महादेव भोसले म्हणाले की, ॲड राहुल सावंत यांनी बोलल्याप्रमाणे श्रीदेवीचामाळ येथे कायम लक्षात राहण्यासारखे कार्य केले असून त्यांच्या निधीतून दोन लाखाचा आर ओ प्लांट आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यन्वित झाला,हे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. यापुढेही त्यांनी असे सहकार्य करावे असेही यावेळी ते म्हणाले.ॲड. राहुल सावंत म्हणाले की, श्री देवीचामाळ येथे श्री कमलादेवी मंदिरात माझ्या विकास निधीतून भक्त व ग्रामस्थ यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था पाहिजे व शुद्ध पाण्यामुळे शरीर निरोगी राहावे या हेतूने मी आर ओ प्लांट दिला आहे. हा आर ओ प्लांट आमदार श्री संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेला आहे.
प्रास्तविक श्री अशोक गाठे यांनी केले तर स्वागत सरपंच महेश सोरटे यांनी केले आणि आभार प्रदर्शन ग्रामसेवक आबासाहेब शिंदे यांनी केले

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group