स्वर्गीय ज्ञानदेव जगन्नाथ भोईटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाशिंबे येथे रक्तदान नेत्ररोग शिबीर संप्पन्न
करमाळा प्रतिनिधी देशभक्त स्वर्गीय जगन्नाथ कृष्णाजी भोईटे चारिटेबल ट्रस्ट,वाशिंबे ता. करमाळा जि. सोलापूर यांच्यावतीने स्वर्गीय ज्ञानदेव जगन्नाथ भोईटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त… नेत्र निदान शिबिर, भव्य रक्तदान शिबिर, 251वृक्षारोपण, वृद्ध लोकांना काटी वाटप, हिमोग्लोबिन चाचणी,शाळेतील मुलांना खाऊ वाटप कोविड योद्धांचा सन्मान.. असे विविध कार्यक्रम वाशिंबे जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्याचे लोकनेते मा.आमदार नारायण आबा पाटील,नेते मा.श्री.नवनाथ बापू झोळ,यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष या.श्री. गणेश भाऊ करे पाटील, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष.मा.श्री. रामदास झोळ सर,पांडुरंग सूर्यवंशी संपादक दैनिक कटू सत्य व वृत्तदर्पण न्यूज चैनल सोलापूर, हृदयरोग तज्ञ रोहन पाटील करमाळा, ह.भ.प.माऊली झोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी.भोंडवे मॅडम,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक केंद्र कोर्टी डॉ. हेमंत येवगे, लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ, उपसरपंच सौ.ज्योतीताई टापरे, स्वातीताई साळुंके,डॉ.संजय साळुंके ,डॉ. विक्रम नाळे, डॉ. सुदर्शन नवनाथ झोळ, यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नेत्र शिबिराचा 47 लोकांनी लाभ घेतला, त्याची हिमोग्लोबिन चाचणी 169 लोकांनी केली. व रक्तदान शिबिरात लोकांनी 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल भोईटे,व भोईटे परिवार मित्र मंडळ यांचा सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री सचिन भोईटे यांनी केले.
