Friday, September 18, 2026
Latest:
करमाळा

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे गेल्या चार महिन्यापासुन प्रलंबित अनुदान तातडीने मिळावे- ॲड. अजित विघ्ने यांची मागणी


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील संगायो योजनेतील अनेक लाभार्थ्यांना गेली चार महिन्यापासुन अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे अनेक वृद्ध निराधार लाभार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. केवायसी च्या व पडताळणीच्या नावाखाली गेल्या चार महिन्यांपासून या लाभार्थ्यांचे अनुदान शासनाने दिलेले नाही. यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासहीत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे. तरी देखिल अशा लाभार्थ्यांचे अनुदान अदयापही जमा झालेले नाही. त्यामुळे सदरचे अनुदान तातडीने देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!