बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी पांडे गटातुन निवडणुक लढवावी -दिनेश भांडवलकर
करमाळा प्रतिनिधी बागल गटाचे युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक पांडे गटातून लढवावी अशी मागणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा .संचालक दिनेश भांडवलकर यांनी केली आहे. सध्या करमाळा तालुक्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यामध्ये प्रत्येक गटाकडून वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.दिनेश भांडवलकर यांनी पांडे गटातून दिग्विजय बागल यांनी जिल्हा परिषद उमेदवारी करीता मागणी केलेली आहे. पांडे गट जिल्हा परिषद बागल गटासाठी अतिशय अनुकूल असून स्व .दिगंबरराव बागल मामांना मानणारा बागल गटाला माननारा वर्ग खूप मोठा असल्याने दिग्विजय बागल या गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ शकतात असा विश्वास दिनेश भांडवलकर यांनी व्यक्त केला आहे. या गटातील सर्वसामान्य मतदार सुद्धा दिग्विजय बागल यांच्याकडे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून पाहत असल्याचे दिनेश भांडवलकर यांनी सांगितले आहे.
