करमाळा शहरातील फंड गल्ली येथील स्वामी समर्थ मंदिराच्या सुशोभिकरण कामाचे मा . नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन.
करमाळा प्रतिनिधी – करमाळा शहरातील फंड गल्ली येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या फरशीकरणासह इतर गरजेची कामे आणि सुशोभीकरण वर्गणी अभावी रखडले होते. ही बाब माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही संपूर्ण कामे स्वखर्चातून करण्याचे ठरविले आणि तातडीने लागणारे सर्व साहित्य त्वरित खरेदी करून दिले २९ डिसेंबर रोजी माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हस्ते या कामाचे भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील फंड गल्ली येथे श्री स्वामी समर्थांचे प्रशस्त मंदिर आहे. वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. पुरेशा निधीअभावी या मंदिरात ग्रॅनाईट फरशीकरण, लाकडी चौकट आणि दरवाजा, लाईट फिटिंग, रंगकाम आणि इतर सुशोभीकरण कामे प्रलंबित होती. मा. आ. जगताप यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी ताबडतोब वैभवराजे यांना विशेष लक्ष देऊन ही सर्व कामे पूर्ण करुन देण्याचे सुचवले. जगताप यांच्या या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, झनकसिंह परदेशी, अमोलसिंह परदेशी, हनुमंत फंड, बाळासाहेब बलदोटा, अतुल देवकर, रघुनाथ क्षिरसागर, सतिश फंड, दत्तात्रय शिर्के, अशोक त्रिंबके, सचिन शेळके, ॲड. नवनाथ राखुंडे, धोंडीराम माने, समशेर सय्यद, अस्लम सय्यद यांच्यासह फंड गल्ली आणि सुतार गल्ली परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
