Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

भीम आर्मीचे सर्वसर्वा चंद्रशेखर आझाद यांच्यावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आरपीआय यु.जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी भीम आर्मीचे सर्वेसर्वा मा चंद्रशेखर आजाद साहेब यांच्यावर देवबंद येथे गोळीबार करण्यात आला. गोळीबार इतका तीव्र होता, की त्यांच्या गाडीमध्ये गोळ्या लागल्याचेही दिसून येते ती गोळी त्यांच्या पाठीला घासून गाडीमध्ये आरपार झाली ते थोडक्यात बचावले गेले. या झालेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

मा. चंद्रशेखर आझाद साहेब यांनी वारंवार प्रशासनाकडे सुरक्षा देण्याची मागणी केलेली असताना देखील. प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जातेय. यामुळेच हा हल्ला झाला, असल्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी प्रशासनाने त्वरित पावले उचलत ताबडतोब मा. चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा प्रदान करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने देशभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी निवेदनाची माहीत प्रत राज्यमंत्रि मा.रामदास आठवले साहेब, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री अदित्यनाथ योगी साहेब, मा.जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक करमाळा, उपनिरीक्षक पोलीस अधिक्षक साहेब करमाळा,पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आली.यावेळी तालुका कार्याध्यक्ष नितीन दामोदरे, पप्पू ओहोळ, अमोल गायकवाड,सचिन गायकवाड,संतोष लांडगे, लंकाबाई लांडगे,अश्विनी लांडगे,सचिन लांडगे, नितीन लांडगे,चिराग लांडगे,अभिजीत समिंदर आदी जण उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!