Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मकाई परिवर्तन पॅनेलची लढाई शेतकऱ्यांच्या हितासाठी चालूच राहील- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचे अर्ज आपत्र झाले असले तरी आम्ही निवडणुकीपूर्ती या लढाईमध्ये भाग घेतला असुन शेतकऱ्याच्या हितासाठी मकाई परिवर्तन पॅनलची लढाई चालुच राहिल असे मत प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.पुढे बोलताना ते म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आमची अर्ज बात करण्याचे काम केले असून त्यांना वाटले की आता निवडणूक बिनविरोध होईल यानंतर विरोधक आपल्या वाटेला कधीही जाणार नाही परंतु आम्ही राजकारणासाठी किंवा पदासाठी या निवडणुकीमध्ये सहभागी झाले नव्हतो तर सर्वसामान्य शेतकरी कामगार ऊस वाहतूकदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता सध्या आमचे पाच उमेदवार निवडणूक लढवीत आहेत ते नक्कीच .यशस्वी होतील आमचा विश्वास आहे. निवडणूके पुरते आम्ही आपणास आश्वासन देत नसुन निवडणुक झाल्यानंतरही आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचे कामगाराची थकलेले पगार त्यांचे कोटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहणार आहोत आमच्या बरोबरच्या मंडळींनी याबाबत मनात कुठलीही शंका न मकाई परिवर्तन पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन परिवर्तनाच्या लढाईत सहभागी  व्हावे असे आवाहन प्राध्यापक रामदास झोळ यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group