Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठेना भारतरत्न देण्यात यावा- युवराज जगताप

करमाळा प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे .मातंग समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणेबाबत योग्य तो निर्णय व्हावा अशी मागणी करमाळा मातंग समाजाचे युवा नेते युवराज भाऊ जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना इमेल व्द्रारे मागणी केली आहे.                                  साहित्य आणि समाजकारणात साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे विशेष योगदान आहे.मागास मातंग समाजातून पुढे आलेल्या अण्णाभाऊनी वंचित समाजाच्या व्यथा , वेदना आपले साहित्य व शाहिरी कृतीतून अतिशय परीणामकार रित्या मांडल्या अशा या थोर समाज सुधारकास भारतरत्न पुरस्कार मिळाल्यास त्यांच्या कार्याला साजेल असे कार्य घडणार आहे . अण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले.
तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची ‘वैजयंता’ हि कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटीशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारी ‘फकीरा’ ह्या त्यांचा काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group