शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी

केतूर प्रतिनिधी राजाराम माने केत्तुर ता.करमाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असणारे विद्यार्थी (कृषीदूत) शेतकऱ्यांना , शेतीला असणारी आधुनिकते ची जोड व त्याचे महत्त्व पटवून देत आहेत.कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना दिले जाणारे बीजप्रक्रियेचे प्रशिक्षण , आधुनिकतेचे फायदे- तोटे , फळपिकांच्या वाढीसाठी लागणारे मूलद्रव्ये त्यांची कमतरता ओळखण्यासाठी च्या पध्दती, माती परिक्षणाचे महत्व फळबागांमधील फळ झाडांचे नवीन वाण तयार कसे करतात त्याचे फायदे तोटे , पिकाला खत घालण्याच्या पध्द्ती अतिरिक्त खत वापरल्याचे तोटे ,दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता ,सुपीकता वाढविण्यासाठी वापरली जाणारी हिरवळीची खते ,पाळीव प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या लसी, लसीकरण करण्यासाठी प्राण्यांचे योग्य वय , प्राण्यांसाठी योग्य खाद्य , प्राण्यांच्या खाद्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया ,त्याचे फायदे ई. प्रात्यक्षिके कृषिदूत श्रीनाथ ठोंबरे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना महत्व पटवून दिले दरम्यान कृषीदूत श्रीनाथ ठोंबरे यांना लोकमंगल कृषी महाविद्यालय ,वडाळा येथील प्राध्यापक श्री. डॉ. सचिन फुगे(कृषी अर्थशास्त्र विभाग) , प्रा. डॉ. डी. बी. शिंदे (प्राणिशास्त्र विभाग), प्रा.डॉ शैलेंद्र माने(फलोत्पादन विभाग)प्रा. कुंडलिक जगताप (मृदाशास्त्र विभाग), प्रा.घाडगे सर (कीटकशात्र विभाग ) प्रा. कुदळे मॅडम , प्रा. सुजाता चौघुले मॅडम आदींचे मार्गदर्शन लाभले असे त्यांनी सांगितले.
