Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यात २८ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी तहसील कार्यालय येथे होणार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. २०) तहसील कार्यालय येथे होणार आहे. सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरु होणार असून १३ टेबलवर ७ फेऱ्यातही मतमोजणी होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही कडक बंदोबस्त असणार आहे.. एकुण ८२.४६ टक्के मतदान झाले असून कामोणेत सर्वात जास्त म्हणजे ९३.८० टक्के तर गोयेगावमध्ये सर्वात कमी म्हणजे ५२.८९ टक्के मतदान झाले आहे. मतदान होताच सर्व उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत.
मंगळवारी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. १३ टेबलवर सात फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून सर्वात शेवटी संवेदनशील गावांची मतमोजणी होणार आहे . अशी होणार मतमोजणी पहिली फेरी वरकटणे अंजनडोह कुंभारगाव घरतवाडी मोरवड दुसरी फेरी खडकी विहाळ भिलारवाडी पोफळज तिसरी फेरी पारेवाडी टाकळी कात्रज पोंधवडी चौथी फेरी हिंगणी पोमलवाडी रिटेवाडी मांजरगाव पाचवी फेरी कोंढार चिंचोली देलवडी दिवेगव्हाण तरटगाव सहावी फेरी खातगाव शेलगाव वां सोगाव कामोणे सातवी फेरी जिंती वाशिंबे दहीगाव एका फेरीत एकुण तेरा टेबलवर मतमोजणी होणार.. एका टेबलवर एक प्रभाग असेल.. असे एकुण १३ प्रभाग एका फेरीत मोजले जातील.. अशा एकुण ७ फेऱ्या होतील.. व सर्व ३० गावातील मतमोजणी पुर्ण होईल. पहील्या फेरी मधे असणारे गावांचे निकाल९:३० पर्यंत, दुसऱ्या फेरीतील १० वाजता, तिसऱ्या फेरीचे१०:३० वाजता, चौथ्या फेरीचे११ वाजता, पाचव्या फेरीचे११:३० वाजता, सहाव्या फेरीचे१२:०० वाजता आणि सातव्या फेरीचे १२:३० वाजता निकाल हाती येतील.निवडणुक विभागाने मतमोजणीचे नियोजन केले आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group