अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी बहुजण संघर्ष सेनेची करमाळयात निदर्शने
करमाळा प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावी आंबेडकर जयंती काढली म्हणून अक्षय भालेराव याला जातीवादी गावगुंडांनी तलवारीचे वार करून ठार मारले या घटनेचा निषेध करण्यासाठी व अक्षयच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून करमाळा तहसील कार्यालयासमोर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यावेळेस भाषनातुन राजाभाऊ कदम म्हणाले भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोंढार गावात काढण्यास गावातील जातीवादी गावगुंड मनाई करतात अक्षय श्रावण भालेराव स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावात काढली त्या जयंतीला नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लागला होता जातीवादी गावगुंडांना काहीच विरोध करता आला नाही मनामध्ये राग होता गावगुंडांच्या घरातीलच लग्नाची वरात गावातील मुख्य रस्त्यावरून चालू होती त्यावेळेस अक्षय वरती तलवारीचे वार करून अक्षयला ठार मारले,या घटनेचा महाराष्ट्रात निषेध होतोय तोपर्यंतच लातूर येथे मातंग समाजाचे गिरीधारी नावाच्या माणसाचा व्याजाच्या पैशामुळे सावकाराने खून केला, मुंबई येथील सावित्रीबाई फुलेवस्तीगृहातील बौद्ध समाजाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले एका घटनेचा निषेध करेपर्यंतअन्याय अत्याचाराच्या घटना घडत राहतात एवढी महाराष्ट्रा मधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे मग गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे काय तेव्हा गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा जर गृहमंत्र्यांनी राजीनामा नाही दिलातर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि नैतिक जबाबदारी पार पाडावी या तिन्ही घटनेतील खुन झालेल्या पिढी तांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये प्रत्येकी मदत द्यावी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे व पिढीत कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे या आमच्या मागण्या आहेत.
अनुसूचित जाती जमाती, मुस्लिम, ख्रिश्चन, या अल्पसंख्यांक समाजावरती अन्याय अत्याचाराची मालिका सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारनेकायदा सुव्यवस्था अबाधित राखावीअन्यथा महाराष्ट्रामध्ये दंगली उसळतील त्याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील.
आमचे आंदोलन कुठल्याही जातीच्या विरोधात नसूनगुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात आहे अन्याय अत्याचार नाही थांबल्यासयापुढे तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील असा इशारा राजाभाऊ कदम यांनी दिला
या वेळेस प्रेम कुमार सरतापे,सुहास ओहोळ यांचिही भाषणे झाली
निवेदन तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी स्वीकारले,एपी. आय. साने साहेब यांनी पोलीस बंदोबस्त चोक ठेवला होता
बहुजन संघर्षनेचे तालुकाध्यक्षअंगद लांडगे, शहराध्यक्षआजिनाथ कांबळे, शहर सचिव कालिदास कांबळे , राहुल गरड, निखिल गरड, दादासाहेब धेंडे, राहुल खरात श्रीरंग लांडगे, रवी घोडके सरपंच अंळजापूर, सतीश ओहोळ सरपंच सालसे, विष्णू रंधवे सरपंच पोथरे, संदीप पाटिल सरपंच, दादा चव्हान , दादा लांडगे, सचिन भोसले, सुनील गरड,नवनाथ खरात,अमोल गायकवाड कचरू जगदाळे, सचिन चितारे, उत्तम गायकवाड, अधिक शिंदे, रमेश भोसले, भाऊ भोसले, मच्छिंद्र गायकवाड, अमोल घोडके, बाळासाहेब गायकवाड, बबन सल्ले,रमा पांडव,लक्ष्मान लोंढे, मनोहर शिंदे, प्रेमचंद कांबळे, भागवत कदम ,विकास कदम, दादा कदम, अबा कदम ,कैलास कदम आदी शेकडो कार्यकर्ते उपस्तीत होते
