Wednesday, September 23, 2026
Latest:
करमाळा

हिसरे येथे संजयमामा शिंदे गटाला धक्का अशोक जाधव यांचा रश्मी बागल यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश

करमाळा प्रतिनिधी
हिसरे ता.करमाळा येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाला धक्का बसला असुन भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या उपस्थितीत हीसरे येथील अशोक जाधव यांनी शिंदे गटाला राम राम करत महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.मागील अनेक दिवसांपासून करमाळा तालुक्यातआ.संजयमामा शिंदे गटाला गळतीचे सत्र सुरू असून पुढील काही दिवसाथ संजय मामा शिंदे गटातून महायुतीला साथ देणाऱ्यांचे मोठे प्रवेश होणार असून माहिती बागल कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

यावेळी हीसरे येथील प्रवेश केलेल्या अशोक जाधव यांनी सांगितले की भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
यावेळी मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन दिनेश भांडवलकर सतीश नीळ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!