Tuesday, September 22, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक ४च्या विकासासाठी १० कोटी ७० लाखांचा निधीची भाजप नगरसेविका स्वातीताई फंड यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विविध विकासकामांना गती देण्यासाठी तब्बल १० कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका सौ. स्वातीताई महादेव फंड यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था तसेच महिला भवन आदी विकासकामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे स्वातीताई फंड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या विकासकामांसाठी करमाळा नगरपरिषद तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.या
निवेदनानुसार, कृष्णाजीनगर येथे ७ ते ८ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, कृष्णाजीनगरमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी २ कोटी रुपये, गणेशनगर येथील रस्ते काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी २ कोटी रुपये, शाहूनगर येथील रस्ते काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी २ कोटी रुपये, भवानी नाका परिसरातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपये, तर गणेशनगर येथे महिला भवन बांधण्यासाठी ७० लाख रुपये, असा एकूण १० कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये हद्दवाढ होत असून नागरिकांच्या दैनंदिन गरजांच्या तुलनेत उपलब्ध नागरी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते व गटारांसारख्या मूलभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच महिलांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला भवनाची उभारणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व विकासकामांना प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका सौ. स्वातीताई महादेव फंड यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!