राज्यस्तरीय ऑनलाईन वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेमध्ये पटकावला कुमारी जान्हवी सावंत हिने प्रथम क्रमांक संपादीत करून उत्तुंग यश
करमाळा प्रतिनिधी राज्यस्तरीय ऑनलाईन वेशभूषा व वकृत्व स्पर्धेमध्ये तिसरी व चौथी च्या प्रवर्गात राज्यस्तरावर कुमारी जान्हवी राहुल सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल करमाळा तालुक्यात व शहरात विशेषत: करमाळा तालुका हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा, व आमदार संजय मामा शिंदे यांच्या कडून तिचे कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ” शिवाजी भोसले इज्युवर्ल्ड ” आयोजित 11 वी राज्यस्तरीय ऑनलाईन वेशभूषा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तिने सहभाग नोंदविला होता. यु ट्युब लिंकवर क्लिक करून तिने व्हिडिओ च्या माध्यमातून केलेल्या सादरीकरणाचे मूल्यमापन करून युजर्स यांनी भरघोस views, लाईक्स व कमेंट्स मिळवून या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच करमाळा शहर व तालुका परिसरातील विविध सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकारी यांनी कुमारी जान्हवी हिचे तोंडभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या,,कु. जान्हवी ही कामगार नेते कै. सुभाष आण्णा सावंत यांची नात व मा.पंचायत समिती सदस्य व हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांची कन्या आहे. तसेच या स्पर्धेत जान्हवी बेस्ट परफॉर्मन्स ॲवाॅर्ड टॉप ची मानकरी देखील ठरली आहे. तिचा राज्यात पहिला क्रमांक येण्यासाठी ज्यांनी यु ट्युब लिंकवर तिला view व लाईक करून प्रोत्साहन दिले त्या सर्वांचे समस्त सावंत परिवार, करमाळा यांचे वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.
