देशामध्ये अस्थिरता असताना राहुलभैय्या जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा हे कार्य कौतुकास्पद -बबनराव ढाकणे माजी केंद्रीय मंत्री
करमाळा प्रतिनिधी आज देशामध्ये अस्थिरता असताना करमाळा सारख्या शहरात मात्र राहुलभैय्या जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले हि अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन माजी.केंद्रीय उर्जामंत्री मा.बबनराव ढाकणे यांनी केले.ते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त व करमाळा नगरपालिकेचे मा.नगरसेवक राहुल (भैय्या) जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नेत्ररोग तपासणी,मोतिबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मेवाटप शिबिराच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन बोलत होते.करमाळा शहरातील विकी मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पुढे बोलताना मा.श्री ढाकणे म्हणाले कि स्व.नामदेवराव जगताप व माझी खुप जुन्या काळातील मैत्री होती.ते काँग्रेस पक्षात तर मी जनता पक्षात काम करत होतो.१९८२ च्या भिषण दुष्काळात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी या सोलापुर व नगर जिल्ह्यात दुष्काळाची पहाणी करण्यासाठी आल्या असताना स्व.नामदेवरावजी जगताप यांनी इंदीराजी गांधी यांच्यासमोर दुष्काळात होरपळणाऱ्या करमाळा व नगर जिल्ह्यातील नागरिकांची व्यथा मांडुन त्यावर ताबडतोब ठोस उपाययोजना करायला भाग पाडले होते इतका वचक त्यांचा होता.माझे शिक्षण इयत्ता ७ वी पर्यंतच झाले होते परंतु नामदेवरावजी जगताप यांचे शिक्षण इयत्ता ४ थी पर्यंत असतानाही त्यांची काम करण्याची पध्दत हि खुपच वाखण्याजोगी होती.त्यांनी उजनी धरणासाठी जीवाचे रान करुन पुणे जिल्ह्यामध्ये होणारे उजनी धरण हे आपल्या कौशल्याने सोलापुर जिल्ह्यात खेचुन आणले व त्याकाळी दुष्काळी जिल्हा म्हणुन हिणवणाऱ्या सोलापुर जिल्ह्यात आज जवळपास ३४ साखर कारखाने ऊभे आहेत.त्याबरोबरच मोठ्या शिक्षण संस्था उभा केल्या.आज साहेबांचाच वारसाचिंतामणीदादा,राहुल भैय्या,व प्रताप चालवत आहेत याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मकाई साखर कारखान्याचे चेअरमन श्री.दिग्विजय बागल यांनीही आपले विचार व्यक्त केले.यावेळी श्री. बागल म्हणाले कि आज राहुलभैय्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजपयोगी कार्यक्रमाचे नियोजन केले हे खुप कौतुकास्पद आहे.वास्तविक पहाता आजच्या काळात वाढदिवस म्हटले की डी.जे.लावुन पार्ट्या केल्या जातात. यामुळे देशातील तरुणपिढी भरकटत चालली आहे.परंतु समाजातील गोर गरीब व गरजु व्यक्तींसाठी मोफत डोळे तपासणी,चष्मेवाटप,तसेच मोतिबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया हा सामाजिक उपक्रम राबवुन तुम्ही तीनही बंधु समाजसेवा करीत आहात याचा मला खुप अभिमान आहे.मी तुमचा धाकटा बंधु म्हणुन येणाऱ्या काळातही तुमच्या खांद्याला खांदा लावुन तुमच्या सोबत असेल असे शेवटी म्हणाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन विद्या विकास मंडळाचे सचिव श्री विलासराव घुमरे सर,शिवसेनेचे माढा तालुक्याचे नेते श्री.संजयबाबा कोकाटे,मकाई कारखान्याचे संचालक संतोषराव देशमुख, जिल्हा दुध संघाचे मा.संचालक श्री राजेंद्रसिंह राजेभोसले, डाॕ.उरणकर, करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक अतुल फंड, नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद फंड सर, मराठा महासंघाचे मा.अध्यक्ष बलभिमदादा राखुंडे,सचिन काळे,आदि उपस्थित होते.प्रास्ताविक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती चिंतामणीदादा जगताप यांनी केले तर आभार सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर सर यांनी मांडले.यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील जवळपास ४२७ लाभार्त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरात मोफत डोळे तपासणी,चष्मे वाटप, मोतिबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया याचा मोफत लाभ लाभार्त्यांना मिळाला.तपासणीसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे डाॕ.अनिल खटके,अकलुज उपजिल्हा रुग्णालयाचेडाॕ श्रीकांत कल्याणी,सिव्हील हाॕस्पिटल सोलापुरचे डाॕ.शिंदे,कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॕ गर्जे,व टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॕ.बांगर यांनी सर्व लाभार्त्यांची तपासणी केली.तद्नंतर दुपारी ४ वाजता वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा शहरातुन फोर व्हिलर रॕलिचे आयोजन केले होते.ही रॕली दत्तमंदीरापासुन सुरु होउन एम.एस ई बी मार्गे देविचामाळ येथे पोहचली त्याठिकाणी आई कमलादेवीचे दर्शन घेऊन बायपास मार्गे मार्केट कमेटी येथे पोहचुन स्व.नामदेवराव जगताप साहेबांचे पुतळ्याचे पुजन करण्यात आले.व सुभाष चौकातुन या रॕलीची समाप्ती विकी मंगल कार्यालयाजवळ झाली.यावेळी पावसाने हजेरी लावुन सुध्दा या रॕलीस उत्तम प्रतिसाद मिळाला हा विषय करमाळा शहरात चर्चेचा ठरला.
सायंकाळी ७ वाजता राहुलभैय्या जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन विकी मंगल कार्यालयातील हाॕलमध्ये केले होते.सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहु महाराज व स्व.नामदेवरावजी जगताप यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव श्री.विलासराव घुमरे सर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंतामणीदादा जगताप यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात श्री चिंतामणीदादा जगताप यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत करुन स्व.नामदेवरावजी जगताप यांच्या कांही ठळक आठवणींना उजाळा दिला.व स्व नामदेवरावजी जगताप यांनी जिल्ह्याच्या विकासामध्ये दिलेले योगदान व समाजहिताचे केलेले कामांची माहीती दिली. समाजामध्ये काम करताना अनेक संकट आली किंबहुना आणली गेली परंतु खऱ्या अर्थाने साहेबांचे आर्शिवाद पाठिशी असल्याने मला कधीही चिंता करावी लागली नाही असे बोलताच उपस्थितांमधुन टाळ्या वाजवुन दाद मिळाली. यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.दिग्विजय बागल,यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील,सावंत गटाचे नेते श्री.सुनिलबापु सावंत,उद्योजक दिग्विजय मोरे,इत्यादी मान्यवरांनी राहुलभैय्या जगताप यांना आपल्या मनोगतातुन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा.बळीराम काका साठे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि स्व.नामदेवराव जगताप यांनी मला काँग्रेस पक्षात काम करण्याची संधी देऊन माझा राजकारणात प्रवेश केला.व जगताप कुटुंबियांचे त्यावेळेस पासुन जिव्हाळ्याचे संबंध आहेत.त्यामुळे मी त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य असुन त्यांच्या पाठिशी माझे सदैव आर्शिवाद आहेत.यावेळी श्री साठे यांनी स्व.नामदेवराव जगताप साहेबा सोबतचे कांही किस्से सांगितले यावेळी ते भाऊक झाल्याचे दिसत होते.
आपल्या झालेल्या सत्काराला उत्तर देताना राहुलभैय्या जगताप यांनी उपस्थित मान्यवर व जनतेचे स्वागत करुन मला यापुढे वाटचाल करताना खऱ्या अर्थाने मला तुमच्या सर्वांच्या आर्शिवादाची गरज असल्याचे सांगुन आमच्या वडीलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच त्याच मार्गाने आम्ही तिघे भाऊ वाटचाल करणार असुन या करिता मला माझे मोठे बंधु चिंतामणीदादा जगताप व प्रतापराव यांची नेहमीच साथ मिळते.माझा वाढदिवस व राजर्षी शाहु महाराज यांचा जन्मदिवस एकाच दिवशी असुन साहेबांची पुण्यतिथी व शाहु महाराज यांची पुण्यतिथीही एकाच दिवशी येते हा योगायोगच असल्याचे शेवटी राहुलभैय्या जगताप यांनी सांगितले .
आपल्या अध्यक्षिय भाषणात बोलताना श्री घुमरे सर यांनी सामाजिक उपक्रम राबवत असल्यामुळे चिंतामणीदादा,राहुलभैय्या, व प्रतापराव जगताप यांचे कौतुक केले.असे सामाजिक काम करताना भविष्यातही आपण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी व्यासपिठावर सावंत गटाचे नेते सुनिल सावंत,जलतज्ञ अनिल पाटील,नगरसेवक अल्ताफसेठ तांबोळी, महादेव फंड, संचालक संतोषराव देशमुख, दिनेशसेठ भांडवलकर, सो.जि.काँग्रेस आयचे सरचिटणीस खोचरे- पाटील,श्री भारत माने,श्री.रोहीदास ढेरे,श्री.राहुलशेठ खाटमोडे,पं.स.सदस्य दत्तात्रय जाधव,श्री जोतीराम लावंड मेजर,श्री.कल्याण सरडे सर,श्री.चंद्रकांत काळे,श्री.योगेश दळवे सर,रा.काँ.चे तालुकाध्यक्ष हणुमंत मांढरे,श्री.फारुक जमादार, पाडळीचे सरपंच गौतम ढाणे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.आनंदकुमार ढेरे,श्री.शशिकांत केकाण,श्री.संतोष वारे उपस्थित होते.तर कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्तेकाचे स्वागत तालुका काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष श्री प्रतापराव जगताप यांनी केले तर आभार प्रदर्षन सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखील कदम,नितीन चोपडे,राहुल जाधव, संदेश माळवे यांनी परिश्रम घेतले.
