देवळाली माजी सरपंचाला गावातील तिघाकडून जमीनीच्या वादावरून मारहाण
करमाळा प्रतिनिधी गहिनीनाथ रामभाऊ गणेशकर, वय-34 , व्यवसाय-शेती, रा. देवळाली.ता. करमाळा, जि सोलापुर समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब दिला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की देवळाली या ठिकाणी वडील रामभाऊ, आई छायाबाई, पत्नी आश्विनी, मुली अरोही व शिवन्या असे एकत्रात राहणेस असुन आम्ही शेती व्यवसाय करून कुटुंबाची उपजिवीका भागवितो. आमचे गावातील अनिकेत औंदुबर गणेशकर, नागनाथ आशोक चव्हाण, श्रीकांत आशोक चव्हाण हे आमचे घरा शेजारी राहणेस आहे. आमची शेती गट नंबर 153 असुन त्या गटामध्ये आमची शेती व आमच्या गावातील अनिकेत औंदुबर गणेशकर यांची शेती आहे. अनिकेत औंदुबर गणेशकर हा नात्याने चुलत भाऊ आहे. अनिकेत औंदुबर गणेशकर यांचेत व आमचेत गटातील रस्त्यावरून तहसील यांचेकडे तारखा चालु आहेत.
आज दि. 25/09/2024 रोजी सकाळी 12.00 वाचे सुमारास मी करमाळा येथील अडतीवर उडीदाचे माप करणेसाठी गेलो होतो. वडीदाचे माप झाले नंतर मी दुपारी 04.30 वाचे सुमारास आमचे गावी देवळाली येथे घरी आलो असता अनिकेत औंदुबर गणेशकर, नागनाथ आशोक चव्हाण, श्रीकांत आशोक चव्हाण हे आमचे घरासमोर आले. अनिकेत गणेशकर हा मला म्हणाला की, आपला रस्त्याचा विषय तहसील मध्ये चालु असताना तुम्ही रस्त्याच्या कारणावरून आमचे विरुध्द पोलीस ठाणेस का तक्रार देतात असे म्हणुन अनिकेत औंदुबर गणेशकर यांनी थांब आता तुला दाखवितो असे म्हणुन त्याचे हातातील काठीने माझे पाठीवर मारहाण करू लागला तसेच नागनाथ आशोक चव्हाण व श्रीकांत आशोक चव्हाण यांनी मला हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली. त्यावेळी मी मोठ मोठ्याने ओरडलो असता माझा ओरण्याचा आवाज ऐकुण माझी पत्नी आश्वनी, आई छायाबाई हे ओरडत माझेकडे धावत आले. ते आल्याचे पाहुण ते तिघे तेथुन जात असताना त्यातील अनिकेत गणेशकर म्हणाला की, आता तुला सोडला आहे, तुम्हाला पाठीमागे एकदा कसे पुण्यातील पोर आणुन मारले होते. तसे पुन्हा एकदा मारणार आहे असे म्हणून धमकी देत निघुन गेले. त्यानंतर मी करमाळा पोलीस ठाणेस तक्रार देणेस आलो आहे.तरी दि. 25/09/2024 रोजी दुपारी 04/30 वा.सु. माझे घरासमोर अनिकेत औंदुबरI.I.F.-I (एकीकृत अन् वेषणफॉर्म १) गणेशकर, नागनाथ आशोक चव्हाण, श्रीकांत आशोक चव्हाण अनिकेत गणेशकर हे आलो व मला अनिकेत गणेशकर म्हणाला की, आपला रस्त्याचा विषय तहसील मध्ये चालु असताना तुम्ही रस्त्याच्या कारणावरून आमचे विरुध्द पोलीस ठाणेस का तक्रार देतात असे म्हणुन मला थांब आता तुला दाखवितो असे म्हणुन त्याचे हातातील काठीने माझे पाठीवर मारहाण करून तसेच नागनाथ आशोक चव्हाण व श्रीकांत आशोक चव्हाण यांनी मला हाताने, लाथाबुक्याने मारहाण करून अनिकेत गणेशकर म्हणाला की, आता तुला सोडला आहे, तुम्हाला पाठीमागे एकदा कसे पुण्यातील पोर आणुन मारले होते. तसे पुन्हा एकदा मारणार आहे असे म्हणून धमकी देत निघून गेला आहे. म्हणून माझी अनिकेत औंदुबर गणेशकर, नागनाथ आशोक चव्हाण, श्रीकांत आशोक चव्हाण यांचेविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर करीत आहे.
