करमाळयास तारखेला का आलास या कारणावरून देवळाली येथील तिघांनी एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
करमाळा प्रतिनिधी जमीन वाटपा संदर्भात सुरू असलेल्या प्रकरणाच्या तारखेसाठी करमाळा तहसील कार्यालया का आलास या कारणावरून तिघांनी एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. ही घटना २५ सप्टेंबर ला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास देवळाली येथे घडली. या प्रकरणी अनिकेत औदुंबर गणेशकर, रा. देवळाली, ता. करमाळा (सध्या वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे कुटुंब व चुलत्यांचे कुटुंब यांच्यात जमिन वाटपावरून तहसिल व प्रांत यांचेकडे तारखा चालु आहेत. २५ सप्टेंबर ला असलेल्या तारखेसाठी करमाळा तहसील कार्यालयात हजर राहिलो होतो. याचा राग मनात धरून त्याच दिवशी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारासदिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे कुटुंब व चुलत्यांचे कुटुंब यांच्यात जमिन वाटपावरून तहसिल व प्रांत यांचेकडे तारखा चालु आहेत. २५ सप्टेंबर ला असलेल्या तारखेसाठी करमाळा तहसील कार्यालयात हजर राहिलो होतो. याचा राग मनात धरून त्याच दिवशी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास आमचे चुलते रामभाउ इंद्रजीत गणेशकर, विनायक इंद्रजीत गणेशकर व चुलतभाउ गहिनीनाथ रामभाउ गणेशकर असे माझेकडे त्यांचे हातात लाकडी दांडके व कु-हाडीचा दांडके घेवून आले व गहिनीनाथ गणेशकर याने मला तु तारखेला का आला असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करून त्याचेकडील लाकडी दांडक्याने त्याने माझे पाठीत व उजवे पायावर व घोटयावर मारले. त्यावेळी रामभाउ गणेशकर याने त्याचे हातातील कु-हाडीचे दांडक्याने मला तु व तुझे वडील यांनी इकडे यायचे नाही, जर तुम्ही इकडे दिसलात तर तुमचे तुकडे करतो असे म्हणुन शिवीगाळ करून धमकी देवू असे म्हणुनपाठीत मारली. त्यावेळी विनायक गणेशकर यानेमला लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळकरून दमदाटी केली आहे. त्यावेळी सतिश चव्हाण व आण्णा ज्ञानदेव चव्हाण हे आले वत्यांनी सदरची भांडणे सोडवली. त्यानंतररामभाउ इंद्रजीत गणेशकर, विनायक इंद्रजीत
गणेशकर व गहिनीनाथ रामभाउ गणेशकर हेजाताना मला शिवीगाळ करीत जीवे मारण्याचीधमकी देऊन निघून गेले.याविषयी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे पुढील तपास करत आहेत.
