Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यात भाजप–राष्ट्रवादीचा झेंडा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता प्रमुख नेत्यांना समसमान कौल 

करमाळा प्रतिनिधी : दिनेश मडके
करमाळा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने तालुक्यात वर्चस्व राखत सत्ता मिळवली आहे. भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजयमामा शिंदे मार्गदर्शक विलासराव घुमरे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या साथीने लढवण्यात आलेल्या या निवडणुकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व करमाळा तालुका विकास आघाडी या तिन्ही राजकीय प्रवाहांना संमिश्र यश मिळाले आहे.
या निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे तसेच भाजप नेत्या रश्मी बागल–कोलते यांच्या गटांचे प्रतिनिधी समसमान प्रमाणात निवडून आल्याने करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिकच रंजक ठरली आहेत.
सत्ता वाटपात समतोल
निकालानुसार, आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाचे दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागांवर यश मिळवले आहे. तर भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली भाजप मार्गदर्शक विलासराव घुमरे युवा नेते दिग्विजय बागल जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनेही दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागांवर विजय मिळवत आपली ताकद कायम ठेवली आहे.
जिल्हा परिषद गटांचे सविस्तर निकाल
पांडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या रश्मी दीदी बागल यांनी ९ हजार २४७ मते मिळवत विजय संपादन केला.
वीट जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अश्विनी गणेश चिवटे विजयी झाल्या.
चिखलठाण जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील यांनी ९ हजार ७३९ मते मिळवत बाजी मारली.
कोर्टी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनिता गुळवे यांनी १३ हजार ३७२ मते मिळवत घवघवीत विजय मिळवला.
वांगी जिल्हा परिषद गटातून करमाळा तालुका विकास आघाडीच्या रूपाली गोडसे यांनी १० हजार ३३४ मते मिळवली.
केम जिल्हा परिषद गटातून कल्याणी अजित तळेकर यांनी १० हजार ६६२ मते मिळवत विजय मिळवला.
पंचायत समिती गणांचे सविस्तर निकाल
पांडे पंचायत समिती गणातून करमाळा तालुका विकास आघाडीचे स्वप्निल काळे यांनी ४ हजार ३६ मते मिळवत विजय मिळवला.
कोर्टी गणातून भाजपचे नाना झाकणे यांनी ५ हजार ३६१ मते मिळवली.
साडे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दशरथ घाडगे यांनी ४ हजार ९३३ मते मिळवत निवडणूक जिंकली.
वीट गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा ढेरे यांनी ५ हजार ३४० मते मिळवली.
चिखलठाण गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनमाला चंद्रकांत सरडे यांनी ४ हजार ८९४ मते मिळवली.
उमरड गणातून करमाळा तालुका विकास आघाडीच्या आदिती अतुल पाटील यांनी ६ हजार २५८ मते मिळवत विजय संपादन केला.
जेऊर गणातून करमाळा तालुका विकास आघाडीच्या ललिता शिरस्कर यांनी ५ हजार ६५६ मते मिळवली.
हिसरे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत आवताडे यांनी ५ हजार ९३८ मते मिळवत बाजी मारली.
केतुर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी ६ हजार ४३४ मते मिळवली.
केम गणातून करमाळा तालुका विकास आघाडीचे ज्ञानेश्वर बिचितकर यांनी ५ हजार ४६३ मते मिळवली.
वांगी गणातून भाजपच्या सोनाली ताकिक यांनी ५ हजार १६७ मते मिळवत विजय संपादन केला.
रावगाव गणातून भाजपच्या संध्या कांबळे यांनी ४ हजार ५५३ मते मिळवली.
राजकीय चित्र अधिक स्पष्ट
या निकालांमुळे करमाळा तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व करमाळा तालुका विकास आघाडी यांची ताकद जवळपास समसमान असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आमदार नारायण आबा पाटील यांनी दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागा जिंकत आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. एकूणच, करमाळा तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव कायम असल्याचे या निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!