करमाळासामाजिक

मी वडार महाराष्ट्राचा संघटना करमाळा तालुका अध्यक्षपदी विकास ननवरे यांची निवड

 

 

करमाळा  प्रतिनिधी मी वडार महाराष्ट्र या संघटनेची राज्याची बैठक नुकतीच मुंबई या ठिकाणी पार पडली ही बैठक मी महाराष्ट्र वडार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील व्यक्तींच्या जिल्हा आणि तालुका पातळीवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन त्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्यावेळी करमाळा तालुका अध्यक्ष म्हणून विकास ननवरे यांची निवड मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. दत्तात्रय गायकवाड (वस्ताद)यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना ननवरे म्हणाले की, मी वडार महाराष्ट्र संघटनेचा एक तालुका अध्यक्ष या नात्याने संघटनेची ध्येयधोरणे, संघटना मजबूत करणे आणि संघटनेचे विचार सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीन आणि थोड्याच दिवसात संघटनेची करमाळा तालुक्याची कार्यकारणी देखील जाहिर करणार असल्याचे सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group