Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.लक्ष्मी सरवदे आणि संजय सरवदे राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने सन्मानित

घारगाव प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील घारगाव येथील ग्रामपंचायत सदस्या   सौ लक्ष्मी सरवदे व संजय सरवदे या पती-पत्नी यांना ‘वर्थ वेलनेस फाउंडेशन’यांच्यावतीने सन २०२२ चा “राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार” जाहीर झाला आहे. सरवदे यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सरवदे ह्या पती संजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप, गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप, करुणा काळातील लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती देणे, लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगणे, लस घेण्यास प्रवृत्त करणे,
शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण, शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देणे, लोकवर्गणीतून अनेक समाज उपयोगी कामे करणे, डोळे तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, मतिमंद अस्थिव्यंग विद्यालयात वह्या पुस्तके खाऊ वाटप, निराधार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊ वाटप, सर्वसामान्य व गोरगरीब पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेऊन त्यांनी अनेक विद्यार्थी व पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे पती संजय सरवदे यांना देखील आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वर्थ वेलनेस फाउंडेशन नवी दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष मानसी वाजपेयी व सह संस्थापक सोमय्या वाजपेयी यांनी त्यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, विद्यमान सरपंच अनिता राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश अंगद पवार, आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे, कविता होगले, समस्त घारगावकर ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो.त्यांच्या या सामाजिक कामात पती संजय सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group