करमाळासकारात्मक

करमाळा आणि पाण्या वाचून तरमाळा अशी अवस्था पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करणार – नगरसेवक अल्ताफ तांबोळी

करमाळा प्रतिनिधी गेल्या चार पाच दिवसापासून करमाळा शहरात पाणी वाचून नागरिकांची ताराबंळ झाली आहे तांत्रिक कारण सांगत सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करमाळा नगरपालिका करत असुन‌ पाण्याचा प्रश्न तात्काळ न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बागल गटाचे नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांनी दिला आहे. करमाळा शहरासह सागर चित्रमंदिरासमोरील गाळ्यासमोरही घाणीचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे याला कोणी वाली राहिला नाही.एकीकडे स्वच्छ सुंदर करमाळा दुसरीकडे शहरात घाणीचे साम्राज्य सर्व कारभार रामभरोसे चालू आहे. पाण्याचे बिल दोन महिन्याचे घ्यायचे आणि पाणी मात्र  एक महिनाभर एक दिसत चालू आहे इतर नगरपालिकेच्या पेक्षा जास्त पाणी बिल आकारणी करमाळा शहरात केली जात असतानाही पाण्याची मोठी बोंब होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून लवकरात लवकर पाण्याची समस्या न सोडल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे प्रशासनानेत्याची गांभीर्याने दखल घेऊन पाण्याजवळ शहर स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करण्याचा आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group